Gram Panchayat Election Result : रायगडमध्ये शिंदे गटाचा डंका; अलिबागमध्ये शेकापची बालेकिल्ल्यात पिछेहाट

रायगडमध्ये ही ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची सरशी पाहायला मिळाली.
Gram Panchayat Election Result
Gram Panchayat Election ResultSaam Tv

सचिन कदम

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज झाले आहेत. रायगडमध्ये ही ग्राम पंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाची सरशी पाहायला मिळाली. तर रोहा, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीने गड राखला. मात्र, दुसरीकडे अलिबागमध्ये शेकापची पिछेहाट पाहायाला मिळाली. याचबरोबर पनवेल, उरणमध्ये भाजपने आपली ताकद दाखवली आहे. (Latest Marathi News)

Gram Panchayat Election Result
Ahmednagar news : भाजपचा संगमनेरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; बाळासाहेब थोरातांच्या गावात विखे पाटील गटाने केली सत्ता काबीज

आज, मंगळवारी रायगड जिल्ह्यातील २४० ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल जाहिर झाला. थेट सरपंच निवडणूक आणि राज्यात शिवसेनेमध्ये झालेली फूट, शिंदे गट विरुद्ध आघाडी अशी निवडणूक होत असल्याने या निवडणुकांना विशेष महत्व होते.

रायगडमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाने बाजी मारली. रायगडमध्ये शिंदे गटाचे सर्वाधिक ७९ सरपंच सत्तेत बसले आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते असलेल्या तटकरे कुटुंबीयांनी रोहा, श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीने गड राखला आहे.

अलिबागमध्ये (Alibaug) शिंदे गटाने तीन ग्रामपंचायती शेकापकडून हिसकावून घेतल्याने शेकापचा गड असलेल्या अलिबागमध्ये शेकापची पिछेहाट पहायला मिळाली. पनवेल, उरण आणि तळा तालुक्यामध्ये भाजपने आपली ताकद दाखवून दिली आहे. निवडणुक निकालानंतर सर्व पक्षीय विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, घोषणाबाजी करीत जल्लोश साजरा केला.

Gram Panchayat Election Result
Rajesh Tope : जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; राजेश टोपे यांच्या समर्थ ग्रामविकास पॅनलला मोठा दणका

रायगड जिल्ह्यातील सरपंच विजयी ग्राम पंचायती :

भाजप : 18

ठाकरे गट : 23

शिंदे गट : 79

राष्ट्रवादी : 30

कॉग्रेस : 3

शेकाप : 28

महाविकास आघाडी : 39

अन्य युती : 2

अपक्ष/ स्थानिक आघाडी : 18

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com