रासायनिक खतांमध्ये माती मिश्रीत खडे; खत कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लुट

रासायनिक खतांमध्ये माती मिश्रीत खड्यांची भेसळ करून‌ ती खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रकार उजेडात आला आहे.
Adulteration in chemical fertilizers
Adulteration in chemical fertilizersभारत नागणे

पंढरपूर: रासायनिक खतांमध्ये भेसळ केली‌ जात असल्याचे प्रकार समोर येत असतानाच आता या खतांमध्ये चक्क माती मिश्रीत खडे टाकून शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा काही खत कंपन्यांनी (Fertilizer Companies)सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार अकलूजमध्ये समोर आला आहे.

माळशिरस (Malshiras) तालुक्यातील अकलूज जवळ असलेल्या तोंडले गावातील‌ शेतकरी रणजित चव्हाण यांनी अकलूज येथील एका खताच्या दुकानातून खरेदी केलेल्या महाधन‌ क्राॅपटेक‌ कंपनीच्या ९:२४:२४ या रासायनिक खतांमध्ये चक्क मातीच्या खड्यांची भेसळ आढळून आली आहे. या प्रकरामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

पाहा व्हिडीओ -

आधीच खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढला आहे. त्यातच आता खत कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे. रासायनिक खतांमध्ये माती मिश्रीत खड्यांची भेसळ करून‌ ती खते शेतकऱ्यांच्या (Farmer) माथी मारण्याचा प्रकार उजेडात आला आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या संबंधीत खत कंपनी आणि विक्री करणाऱ्या दुकानदारावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा कृषी विभागाच्या (Department of Agriculture) विरोधात आंदोलन‌ केले जाईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष राहूल बिडवे यांनी दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com