
मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडीतला अविभाज्य घटक असणाऱ्या लोककलावंतांसाठी इतर सर्वसामान्यांप्रमाणेच कोरोनाचा काळ देखील अतिशय खडतर राहिला. अनेक लोककलावंतांनी आर्थिक मदतीचे आव्हान कोरोना काळात केलेले आपण पाहिले आहे.
गावखेड्यात यात्रेनिमित्त चालणारे तमाशे, ऑर्केस्ट्रा व जागरण गोंधळासह इतर सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत. या संपूर्ण काळात या लोककलावंतांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. मात्र आता राज्य सरकारकडून राज्यातील लोककलावंत, लोककला पथकांचे चालक, लोक कलाकार, मालक, निर्माते यांना कोरोना काळात आर्थिक संकटाला सामोरे जावे लागल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासमवेत एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या कलाकारांसाठी एक रकमी कोविड दिलासा पॅकेज देण्यासंबंधी मान्यता दिली असून यासंदर्भात विस्तृत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर लगेच आणावा असे निर्देश देखील दिले आहेत. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत देखील सांस्कृतिक कार्यमंत्री देशमुख यांची एक बैठक संपन्न झाली होती. त्यामुळे या निर्णयाचा मोठा फायदा तमाशा फड, संगीतबारी, दशावतार, शाहिरी, खडीगंमत, नाटके, झाडीपट्टी, सर्कस, टुरिंग टॉकीज, यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांना होणार आहे.
By : Krushnarav Sathe
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.