लहान भावाच्या मृत्यूचे दु:ख अनावर, अंत्यविधीसाठी आलेल्या बहिणीनेही प्राण सोडले

लहान भावाचे निधन झाल्याचे समजताच त्यांची मोठी बहीण सुनीता विजय जैस्वाल या औरंगाबाद येथून अंत्यविधीसाठी आल्या होत्या.
Parabhani Latest News
Parabhani Latest Newsराजेश काटकर

परभणी : लहान भावाच्या निधनाचा धक्का सहन न झालेल्या बहिणीचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना, परभणीतील (Parbhani) पूर्णा येथे घडली आहे. या घटनेमुळे पूर्णा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वेड्या बहिणीची वेडी माया हे गीत आपण ऐकलेले आहे. तसंच बहीण भावाचे हे प्रेमळ नाते भारतीय संस्कृतीत श्रेष्ठ मानले जाते. या भावा बहिणीच्या प्रेमळ आणि एकमेकाला जीव लावणाऱ्या नात्याचा प्रत्यय पूर्णेत (Purna) आला आहे.

हे देखील पाहा -

परभणीतील पूर्णा येथील व्यापारी असलेले सुनील नारायण जैस्वाल (वय ६२ ) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. लहान भावाचे निधन झाल्याचे समजताच त्यांची मोठी बहीण सुनीता विजय जैस्वाल (वय ६५ ) या औरंगाबाद (Aurangabad) येथून अंत्यविधीसाठी आल्या होत्या. सकाळी अकरा वाजता सुनील यांच्या अंत्यविधीची तयारी सुरु असतांना त्यांना दु:ख अनावर होवून हृदयविकाराचा तीव्र धक्का (Heart Attack) बसला अन त्यांतच त्यांचा मृत्यू झाला.

सुनील यांच्यावर आज सकाळी साडेअकरा वाजता तर सुनीता यांच्या पार्थिवावर सायंकाळी शोकाकुल अंत्यसंस्कार करण्यात आले. याघटनेने शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सुनील जैस्वाल यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले ,सून असा परिवार आहे. सुनिता जैस्वाल या सेवानिवृत्त शिक्षीका आहेत त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com