काेकणवासीयांनाे! बाप्पाच्या उत्सवास गावी जाणार आहात? हे वाचा

uday samant
uday samant

सिंधुदुर्ग : कोकणात गणेशोत्सव ganesh festival मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. जिल्ह्यातील मुख्य ठिकाणी तपासणी केंद्र उभारली जाणार आहे. या केंद्रांत यंदा देखील आरोग्य यंत्रणेचा समावेश असेल. गणेशाेत्सवासाठी येणा-या काेकणवासीयांना काेणत्याही प्रकारचा त्रास हाेऊ नये याची सर्वताेपरी काळजी घेतली जाईल असे पालकमंत्री उदय सामंत uday samant यांनी नमूद केले.

गणेशाेत्वाच्या पार्श्वभुमीवर मंत्री सामंत यांनी जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचा-यांची येथे बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी गणेशाेत्सवात येणा-या काेकणवासीयांची काळजी घेणे आपलं प्रथम कर्तव्य असल्याचे स्पष्ट करीत काही महत्वपुर्ण सूचना केल्या.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले येत्या दहा सप्टेंबरपासून गणेशाेत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी सत्तर हजार काेकणवासीय आपल्या घरात श्री गणेशाची स्थापना करणार आहेत. याबराेबर सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळे हा उत्सव साजरा करतील. यंदा गणेशाेत्सवात दाेन ते अडीच लाख लाेक येण्याची शक्यता आहे. आजपर्यंत ५४ टक्के लाेकांनी काेविड १९ प्रतिबंधकची पहिली लस घेतली आहे.

uday samant
अजित पवारांकडून एक गाेष्ट शिकण्यासारखी; राणेंची खाेचक टीका

दाेन डोस घेतल्याने चाकरमान्यांना कोकणात येण्यास कोणतीही अडचण असणार नाही असे मंत्री सामंत यांनी नमूद करीत संबंधितांनी प्रमाणपत्र दाखवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करावा असे स्पष्ट केले. १८ वर्षाखालील बालकांना सिंधुदुर्गात प्रवेश देत आहोत. ज्यांनी ७२ तास आधी आरटीपीसीआर तपासणी केली असले त्यांना प्रवेश दिला जाईल. जे अचानक येतील त्यांची अॅटीजेन तपासणी करून लगेच त्यांना गणेशोत्सवासाठी प्रवेश दिला जाणार असल्याचे मंत्री सामंत यांनी नमूद केले.

रेल्वे स्थानकात ज्या ठिकाणी गर्दी हाेणार आहे. तेथे तीन रांगा करण्याच्या सूचना रेल्वे अधिका-यांना दिल्या आहेत. एक रांग १८ वर्षाखालील गटासाठी, दूसरी ज्यांनी दाेन लस घेतल्या आहेत त्यांच्यासाठी आणि तिसरी ज्यांची तपासणी करायची आहे त्यांच्यासाठी तसेच आरटीपीसीआर करुन आलेल्यांसाठी ही असेल.

रेल्वे, बस, खासगी वाहनातून येणारे ज्यांची अॅंटिजेन तपासणी केल्यानंतर संबंधित नागरिकाचा अहवाल काेविड १९ संशयीत म्हणून आला तर त्यास संस्थात्मक विलगीकरण केले जाईल असे मंत्री सामंत यांनी स्पष्ट करुन काेविड १९ ची मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे असे आवाहन सामंत यांनी केले आहे.

खारेपाटण येथे पाच ते सात किलाेटीर पर्यंत रांगा लागता. या ठिकाणी माेठी वाहने, छाेटी वाहने यांच्या पार्कींगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशाेत्सव काळात काेणाचे ही वीज कनेक्शन ताेडू नये अशा सूचना महावितरणला दिल्या आहेत. त्यास त्यांनी मान्यता दिल्याचे मंत्री सामंत यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com