Raju Shetti: गुढी पाडव्याचा मुहूर्त! राजू शेट्टींनी केली मोठी घोषणा; लोकसभा निवडणूकीत स्वबळाचा नारा

Swabhimani Shetkari Sanghatana: आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने राजू शेट्टींनी ही महत्वाची घोषणा केली आहे.
Raju Shetti
Raju Shettisaam tv

Kolhapur News: आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने राज्यात सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. निवडणूकां पुढील वर्षी होणार असल्या तरी आत्तापासूनच नेतेमंडळी तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मोठी घोषणा केली आहे.

Raju Shetti
Modi Poster news : ‘मोदी हटाओ देश बचाओ’ दिल्लीत जागोजागी बॅनरबाजी; ६ जणांना अटक तर १०० हून अधिक FIR दाखल

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सर्वत्र गुढी पाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर राजू शेट्टी यांनी महत्वाची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शड्डू ठोकला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले सह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी आज केली आहे.

आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण मेळावा सध्या सुरू आहे. यावेळी ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. तसेच यावेळी लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढविण्यातबाबत लवकरच उमेदवारांची यादी ही जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Maharashtra Politics)

Raju Shetti
Pune News: मोठी बातमी! पुण्यातील ओशो आश्रमामध्ये मोठा वाद, जबरदस्तीने अनुयायी घुसले; पोलिसांचा लाठीमार

तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढताना पूर्ण तयारीने उतरणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारीला लागावे,” असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मंगळवारी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे.

दरम्यान, शेतकरी प्रश्नांना घेऊन राजकरणार करणारे माजी खासदार राजू शेट्टी यांचा हातकणंगले मतदार संघात पराभव झाला होता. राजू शेट्टी पुन्हा एकदा त्याच मतदार संघातून निवडणूक लढणार आहे. याबाबतची तयारी देखील राजू शेट्टी यांची सुरू आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com