Gujarat Rain: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार; देवदर्शनासाठी गेलेल्या नंदुरबारच्या ९० भाविकांसाठी NDRFचं पथक ठरले देवदूत

Gujarat Rain: जोरदार पावसामुळे नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गुजरातमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Gujarat Rain
Gujarat RainSaam tv

सागर निकवाडे

Flood like situation in rain-hit Gujarat : 

गुजरातला मुसळधार पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. जोरदार पावसामुळे नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे गुजरातमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुजरातमधील या पुरात नंदुरबार जिल्ह्यातील 90 भाविक अडकल्याची माहिती समोर आली आहे. पुरात अडकलेल्या या भाविकांना NDRF च्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन करत जीव वाचवले आहेत. (Latest Marathi News)

गुजरातच्या अनेक भागांना मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढला आहे . या पावसामुळे अनेक भागातील नद्यांना पूर आला आहे. गुजरातमधील वानाकबोरी धरण ओसंडून वाहत आहे. तर नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

दरम्यान, गुजरातमधील मालसर गावातील नर्मदा काठावर असलेल्या रामधूनसाठी नंदुरबारमधील ९० भाविक गेले होते. मात्र, पुरामुळे अचानक नर्मदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. या मुसळधार पावसाच्या

Gujarat Rain
Gujarat-Madhya Pradesh Rain : गुजरात, मध्य प्रदेशला पावसाचा तडाखा, पूरसदृश्य परिस्थिती; रेल्वेला फटका, अनेक ट्रेन रद्द

मुसळधार पावसामुळे मंदिरातही पाणी शिरले. मंदिरात पाणी शिरल्याने ९० भाविक पुराच्या पाण्यात अडकले होते. या भाविकांना गुजरात NDRF च्या पथकाने या भाविकांच्या रेस्क्यू ऑपरेशन करत वाचवले.

सर्व भाविक आता नंदुरबारच्या दिशेने निघाले आहेत. गुजरातमधील मुसळधार पावसामुळे भाविकांचा संपर्क नातेवाईकांशी तुटला होता. मात्र, या भाविकांच्या रेस्क्यू करत नंदुरबार जिल्ह्यात रवाना करण्यात आलं आहे.

गुजरातला पावसाचा तडाखा

गुजरातला मुसळधार पावसाने तडाखा दिला आहे. मुसळधार पावसामुळे वडोदरा आणि भरूच येथील सखल भागात पाणी साचलं आहे. हवामान खात्याने १९ सप्टेंबरसाठी देखील ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गुजरातसहित मध्य प्रदेशातही जोरदार पाऊस सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com