चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर...! गुलाबराव पाटलांचा पलटवार

गुलाबराव पाटील यांनी आज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले
चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर...! गुलाबराव पाटलांचा पलटवार
चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर...! गुलाबराव पाटलांचा पलटवारभारत नागणे

पंढरपूर - भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrkant Patil सतत काही ना काही टीका करत असतात त्याच वेळेस ते संयमाने वागले असते तर त्यांच्यासोबत शिवसेनेचे 56 आमदार दिसले असते, असा खोचक टोला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनी लगावला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटलांवर टिका केली.

हे देखील पहा -

एकीकडे कोरोनाचे संकट कमी झाले आहे. असेच संकट कमी होऊ दे असं आपण विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडं घातल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र हे पॅकेज शेतकऱ्यांना अपुरे असल्याची खंतही पाटील यांनी‌ यावेळी व्यक्त केली.

चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर...! गुलाबराव पाटलांचा पलटवार
Pune: ट्रक आणि जीपचा भीषण अपघात; दोन्ही वाहने दरीत कोसळली

भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत. याविषयी मंत्री पाटील यांना विचारले असता भाजप त्यांना अपात्रतेची भीती दाखवत असल्याचा आरोप देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडणे अशी टीकाही मंत्री पाटील यांनी भाजपवर केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.