हे वागणं बरं नव्हं; निलेश राणेंचा गुलाबराव पाटलांना इशारा

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा राज्यात निषेध नाेंदविला जात आहे.
nilesh rane & gulabrao patil
nilesh rane & gulabrao patil

सातारा : शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी (hema malini) यांच्या गालाशी रस्त्यांची तुलना केल्याने पाटील (gulabrao patil) यांच्यावर राज्यात टीकेची झाेड उठली आहे. भाजप नेते निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्विट करुन हा माणूस कधीच शुद्धीत नसतो तरी पण नशेत असो किंवा शुद्धीत असो महाराष्ट्रात व देशात हे खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा दिला आहे.

जळगाव येथील एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना त्यांच्या मतदारसंघात अभिनेत्री हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील विविध पक्षातील महिला आघाडी देखील गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध नाेंदवित आहेत.

nilesh rane & gulabrao patil
Asian Champions Trophy Hockey 2021 : चक दे इंडिया; पाकला हरवलं

आज निलेश राणेंनी देखील पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी ट्विट करुन पाटील हे कधीच शुद्धीत नसतात. त्यांच्या अशा वागण्याचा निषेध नाेंदवित हे राज्यात व देशात खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत माध्यमांतून नुकतीच माफी मागितली आहे.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com