Gulabrao Patil: 'मंत्रिपद गेलं खड्ड्यात...' शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांवरुन गुलाबराव पाटलांना संताप अनावर

छत्रपती शिवाजी महाराज हे देवांचे देव आहेत. त्यांच्यापेक्षा कुणीही मोठं नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSaam TV

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल  (Chhatrapati Shivaji Maharaj) चुकीचं वक्तव्य केल्यामुळे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर चौफेर टीका होत आहे. भाजपचा सत्तेतील सहकाही पक्ष बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार, मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसाद लाड यांना सज्जड दम भरत इशारा दिला आहे.

मंत्रिपद गेलं खड्ड्यात, कुणालाही सोडणार नाही, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना खडेबोल सुनावले. (Latest News Update)

Gulabrao Patil
Amol Kolhe VIDEO: आता हसावे की रडावे, शिवरायांबद्दल चुकीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंनी प्रसाद लाडांसमोर कोपरापासून हात जोडले

छत्रपती शिवरायांच्या बाबतीत कोणाही मायच्या लालला बोलण्याचा अधिकार नाही. मग तो कुणीही असो. राज्यपाल असो की कुणीही. छत्रपती शिवाजी महाराज हे देवांचे देव आहेत. त्यांच्यापेक्षा कुणीही मोठं नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

कोणीही उठते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलत आहे. आता इथून पुढे कुणी शिवरायांचा अवमान केला तर मी सोडणार नाही. महाराजांबद्दल चुकीचं बोलणारा तो कुणीही असो वा कुठल्याही पक्षाचा असो, चुकीला माफी नाही, असा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.

Gulabrao Patil
BJP MLA Prasad Lad: छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात; पुन्हा वादाची ठिणगी, चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर लाडांची दिलगिरी

शिवरायांविषयी कोणीही काहीही बोलतंय मात्र हे खपवून घेणार नाही. तो कोणत्याही पक्षाचा असेल त्याला माफ केले जाणार नाही. शिवाजी महाराज हे देवांचे देव आहेत. ज्यांनी चरित्र वाचलंय त्यांनीच बोलावं शिवरायांवर बोलण्यासाठी आचारसंहिता करण्याची गरज आहे. महाराजांच्या नखाची सरही यांना नाही. त्यामुळे मंत्रिपद गेलं खड्ड्यात, कुणालाही सोडणार नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com