Nandurbar : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे १ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा जप्त

Gutka seized at Khapar in Akkalkuwa taluka in Nandurbar : गुजरात राज्यातून रात्रीच्या अंधारात गुटखा, पानमसाला व तंबाखूची तालुक्यात तस्करी होते.
Nandurbar : अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे १ लाख ८१ हजार रुपयांचा गुटखा जप्त
Gutka seized at Khapar in Akkalkuwa taluka in Nandurbarदिनू गावित

नंदूरबार: अक्कलकुवा तालुक्यातील खापर (Nandurbar) येथे स्थानिक गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली. बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गालगत ओम शांती गुरू किराणा दुकानात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून पान मसाला व तंबाखू जप्त (Confiscated) केला. १ लाख ८१ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्यात पान मसाला व तंबाखू विक्रीवर प्रतिबंध असतांना खापर येथील ओम शांती किराणा दुकानात विमल पान मसाला व तंबाखूची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने छापा टाकण्यात आला. (Gutka worth Rs 1 lakh 81 thousand seized at Khapar in Akkalkuwa taluka in Nandurbar)

हे देखील पाहा -

या कारवाई दरम्यान माल बाळगणे व विक्री प्रकरणी आशिष रमेशचंद जैन (वय ३२) व दलपतसिंग लालसिंग राजपुरोहित दोघे राहणार खापर यांच्यावर भादवी कलम ३२८,१८८,२७३ प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार पोलीस नाईक मनोज सुदाम नाईक यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित करीत आहे.

Gutka seized at Khapar in Akkalkuwa taluka in Nandurbar
बीड: 360 गावांना पुराचा धोका; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

अक्कलकुवा तालुक्यात पानटपरी व किराणा दुकानांवर विमल पान मसाला व तंबाखू सहजच मिळते. गुजरात राज्यातून रात्रीच्या अंधारात पानमसाला व तंबाखूची तालुक्यात तस्करी होते. संबंधित विभागाच्या आशिर्वादाने विक्रीसाठी मलिदा घेऊन सूट मिळत असल्याचे सांगितले जात आहे. अक्कलकुवासह खापर येथे अनेक ठिकाणी विक्री होत असतांना स्थानिक गुन्हे शाखेने मात्र एकाच ठिकाणी छापा टाकल्याने तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. बातमी मिळाल्यावरच छापा टाकतो अशी भूमिका स्थानिक गुन्हे शाखेची असेन तर विभाग मात्र इतरांनी दिलेल्या बातम्यावरचं अवलंबून आहे का? मग कर्मचारी कश्यासाठी? असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहे. स्थानिक गुन्हे शाखा तालुक्यात इतर ठिकाणी छापा टाकून कारवाई कधी करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com