बुलडाण्यात प्रतिबंधीत 5 लाख रुपयांचा गुटखा जप्त; तर दोन जण ताब्यात...

शासनाने प्रतिबंधित केलेला केसर युक्त विमल पान मसाला व विमल तंबाखु अशा पांढऱ्या रंगाच्या 30 गोण्या जप्त
बुलडाण्यात प्रतिबंधीत 5 लाख रुपयांचा गुटखा जप्त; तर दोन जण ताब्यात...
बुलडाण्यात प्रतिबंधीत 5 लाख रुपयांचा गुटखा जप्त; तर दोन जण ताब्यात...संजय जाधव

बुलढाणा - खेडी पान्हेरा शिवारात स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये शासन प्रतिबंधित विमल गुटाखा वाहतुक करताना दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर 5 लॉख 45 हजारांचा मुद्देमाल धामनगाव बढे पोलिसांनी जप्त केला आहे. तर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत असलेले पान्हेरा शिवार येथे स्विफ्ट डिझायर मधून विमल गुटखा वाहतूक करताना पोलिसांना आढळले. शासनाने प्रतिबंधित केलेला केसर युक्त विमल पान मसाला व विमल तंबाखु अशा पांढऱ्या रंगाच्या 30 गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा -

यामध्ये एकुण किंमत 1,45,200 रुपयाचा प्रतिबंधीत गुटखा आणि स्विफ्ट डिझायर गाडी चार लाख रुपये असा एकूण 5 लाख 45 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चिखली येथील 54 वर्षीय शेख सलीम शेख इस्माईल व 24 वर्षीय सादिक शा मजीदशा यांच्याकडून विक्रीसाठी वाहतूक करून बाळगताना मिळून आले आहे. आरोपी विरुद्ध विविध कलमांन्वे अन्नसुरक्षा कायदा 2006 नुसार गुन्हा धामनगाव बढे पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.