ती..हळद आणि नंबर! हळदीत नाचताना पडला प्रेमात, भर मंडपात दिला नंबर अन्... (Viral Video)

'ती हळद आणि नंबर' असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे.
ती..हळद आणि नंबर! हळदीत नाचताना पडला प्रेमात, भर मंडपात दिला नंबर अन्... (Viral Video)
Viral Video of HaldiTwitter/@Rumani221

Viral Video of Haldi: उन्हाळा म्हणलं की सुट्ट्या अन् त्यात येतो लग्नाचा सिझन. या लग्नाच्या सीझनमध्ये लग्नात तरुण मुला-मुलींचे एकमेकांना पाहणे - चिडवणे असे प्रकार सुरु असतात. लग्नाला किंवा हळदीला कुठेही गेल्यानंतर सुंदर सुंदर ड्रेस परिधान केलेल्या मुली किंवा मुलं असो, ते नेहमी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. कधी कधी नातेवाईकांच्या कार्यक्रमात एकमेकांना पहिल्यांदा पाहिल्यानंतर अनेकांची लव्हस्टोरी सुरू झालेली आपण ऐकली असेल. (Viral Video of Haldi) गर्दीतला जो चेहरा आपल्याला अचानक आवडतो (Love at First Sight) आणि त्याच्याशी बोलावं, त्या व्यक्तीची माहिती काढावी, त्याचा नंबर मिळवण्यासाठी आपली धडपड सुरु असते. त्या व्यक्तीला चोरून बघण्याची मजाच वेगळी असते. असाच विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरले जाणार नाही.

या व्हिडिओत दिसून येत आहे की, एक काळा शर्ट घातलेला मुलगा बँडच्या तालावर नाचत आहे. तितक्यात त्याचं लक्ष खुर्चीवर बसलेल्या एका मुलीकडे जातं. तो तिला वारंवार पाहू लागतो. त्याचं चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे की, त्याला तिला बोलायचं आहे. ती मुलगी सुद्धा तयाचयाकडे पाहत असते. त्यामुळे तिला नंबर देण्यासाठीची धडपड त्याच्या हालचालींमधून व्यक्त होत असते. मग त्याला युक्ती सुचते अन् नाचत असताना तो बोटांचे हातवारे करू लागतो. ती मुलगी सुद्धा एक एक नंबर टाईप करून घेते आणि त्याचा नंबर मिळवते. त्यानंतर व्हिडिओत दिसून येते की, मुलगा नाचत आहे आणि नाचताना फोन वाजतो आणि बघतो तर काय... नंबर देण्याचे सर्वच प्रयत्न सार्थकी ठरलेले असतात.

Viral Video of Haldi
Photos: कंगना रनौतचा 'धाकड' लूक होतोय व्हायरल...

हा व्हायरल व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सला हसणं काही कंट्रोल होत नाही आहे. तर काहींना आपल्या वैयक्तिक जीवनातील केलेले असे प्रयत्न किंवा लव्हलाईफचे असे किस्से नक्कीच आठवले असतील. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घालत आहे. रूमानी 221 या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला असून "ती हळद आणि नंबर" असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात येत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.