शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं, तर आज मुख्यमंत्री झाला असता : उद्धव ठाकरे

मोहन भागवत यांचं म्हणणं योग्य असेल तर, देशात सुरु असणारा एवढा द्वेष कशासाठी? भाजप जातीचे राजकारण करत आहे, ते तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल देखील त्यांनी मोहन भागवत यांना विचारला.
शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं, तर आज मुख्यमंत्री झाला असता : उद्धव ठाकरे
शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं, तर आज मुख्यमंत्री झाला असता : उद्धव ठाकरे SaamTvNews

मुंबई : मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेनापक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार चिमटा काढला. युतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला आणि शिवसेनेला दिलेलं वचन पाळलं असतं, तर तुम्ही आज मुख्यमंत्री झाला असता. परंतु, तुमच्या ते नशिबात नव्हतं असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना लगावला.

दिलेले वचन पाळून भाजपने शिवसेनेचा मुख्यमंत्री केला असता तर कदाचित मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. कारण, हे माझं क्षेत्र नाही. मी एक पुत्र कर्तव्य निभावण्यासाठी राजकारणात आलेलो आहे, आणि पाय रोवून खंबीरपणे उभा राहिलो आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

RSS बद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

दरम्यान, नागपूरमध्ये राष्टीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आज RSS चा दसरा मेळावा झाला आणि आता शिवसेनेचा होत आहे. आम्हा दोघांची विचारधारा एकच आहे. परंतु,मोहन भागवत यांना मला सांगायचं आहे, मी जी काही टीका करणार आहे ती कृपा करून तुम्ही स्वतःवर घेऊ नका. शिवसेनेचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले आहे. आपण पहिल्यांदा माणूस म्हणून जन्माला येतो. जात-पात म्हणून नाही.

धर्माचा अभिमान असला पाहिजे, धर्म पाळला पाहिजे. पण, देश हाच शिवसेनेचा धर्म आहे. मोहन भागवत यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पने अंतर्गत देशातील सर्वांचे पूर्वज हे एकच होते, आणि आपल्या सर्वांचा वंश एकच आहे. हे जर तुम्हाला मान्य असेल तर, विरोधी पक्षातील लोक हे काय परग्रहावरून आले आहेत का? दिल्लीमध्ये आंदोलन करणारे शेतकरी परग्रहावरून आलेले आहेत का ? लखीमपूर मध्ये जे शेतकरी मारले गेले ते परग्रहावरून आले होते का? असे सवाल त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना विचारले आहेत.

मोहन भागवत यांचं म्हणणं योग्य असेल तर, देशात सुरु असणारा एवढा द्वेष कशासाठी? भाजप जातीचे राजकारण करत आहे, ते तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल देखील त्यांनी मोहन भागवत यांना विचारला.

भाजपला इशारा :

यावेळी मोहन भागवत यांना उद्धव ठाकरे म्हणाले तुमच्या आशीर्वादाने आमच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. या काळात अनेकांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. आमदार फोडण्याचे प्रयत्न केले. पण तुमच्यात हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असे आव्हान त्यांनी यावेळी भाजपला दिले. मी फकीर नाही, झोला घेऊन निघून जाणार नाही, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com