गोंदिया भंडारा जिल्ह्यात गारपीट; अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गारपीट सह अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती.
गोंदिया भंडारा जिल्ह्यात गारपीट; अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत
गोंदिया भंडारा जिल्ह्यात गारपीट; अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेतSaam TV

गोंदिया व भंडारा जिल्ह्यात आज अचानक पावसाने हजेरी लावत वातावरण पूर्णतः बदलून टाकले आहे. इतकाच नव्हे तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गारांचा पाऊस पडला आहे. हवामान खात्याने अगोदरच या अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. शेतकर्‍यांना शेत पिकाची काळजी घेण्यास सूचना दिली होती. भारतीय हवामान खात्याने 28 व 29 डिसेंबरला गोंदिया व भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसासह गारा पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता, त्या नुसार आज सकाळ पासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह गारवा निर्माण झाला होता.

गोंदिया भंडारा जिल्ह्यात गारपीट; अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत
Breaking Jalna: तलाठी पेपर घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गारपीट सह अवकाळी पावसाला सुरुवात झाली होती, परंतु सायंकाळ होताच संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोबतच गोंदियात सुद्धा सायंकाळ होताच पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या, या अवकाळी पावसाने जिथे सामान्य माणसाचे जनजीवन अस्त व्यस्त केले तिथेच दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या माथ्यावर चिंता दिसायला लागली आहे.

वर्तमान परिस्थित दोन्ही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना धान कापून शेतात उघड्यावर ठेवले आहेत, सोबतच हरभरा, तूर, धान तसेच शितकालीन पालेभाज्या पिकाचे सुद्धा नुकसान होत असल्याचे दृश्य दिसून येत आहे. एकंदरीतच अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ तर उडाली होती. सोबत गारपीट सुद्धा पडत असल्यामुळे नागरिकांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com