
Sangli Crime News I सांगलीच्या इस्लामपूर- नवीन बहेनाका परिसरातील पेठकर कॉलनीत हंबीरराव शंकर साळुंखे-खोत या ८० वर्षीय वृद्धाचा लोखंडी हत्याराने डोक्यात वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. हंबीरराव साळुंखे यांना ठार मारून त्यांच्या गळयाला सुती दोरी बांधून गळफास घेतल्याचा बनाव अज्ञात मारेकर्यांनी केला होता. (sangli latest marathi news)
हंबीरराव साळुंखे (hambirrao salunkhe) हे पत्नीसह इस्लामपूरात (islampur) वास्तव्यास आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी हंबीरराव यांची पत्नी मंगल या मुलीच्या बाळाचा सांभाळ करण्यासाठी मुंबईला (mumbai) गेल्या होत्या. त्यामुळे चार दिवसांपासून हंबीरराव साळुंखे हे एकटेच बंगल्यात होते. सकाळी पत्नी मंगल यांनी हंबीरराव यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा फोन उचलला जात नसल्याने त्यांनी हंबीरराव यांच्या भावजयीला, शेजारच्या महिलेने (women) फोन केला. त्या घटनास्थळी आल्या. त्यानंतर दोघींनी मिळून दरवाजाची कडी उघडली. आतील बाजूस असणार्या छोटया बेडरूममध्ये गळयाला दोरी अडकवलेल्या अवस्थेत हंबीरराव जमिनीवर रक्ताच्या थारोळयात पालथे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेची माहिती पोलिसांना (police) व नातेवाईकांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर आत्महत्येचा प्रकार नसून तो खूनच असल्याचे स्पष्ट झाले. खुन्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक पाचारण केले. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.