खळबळजनक! सांगलीच्या मराठी शाळेत सापडला 'हॅंडग्रेनेड', नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

'हॅंडग्रेनेड' बॉम्ब सापडल्याने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खळबळ माजली आहे.
Bomb found in school
Bomb found in schoolsaam tv

सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्यात खळबळ माजली आहे. डफळापूर जवळील कुडनूर गावातील मराठी शाळेत (Marathi School) हॅंडग्रेनेड बॉम्ब (Hand Graned) सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या धक्कादायक घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी जत पोलिसांना तातडीनं दिली. त्यानंतर पोलीस आणि सांगलीतील बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी (Police) बॉम्ब ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरु केला आहे.

Bomb found in school
नागपूरमध्ये खळबळ! पोलिसांच्या हातावर तुरी देत न्यायालय परिसरातून आरोपीने ठोकली धूम

मिळालेल्या माहितीनुसार, कुडनूर शाळेतील मुलं क्रिकेट खेळत असताना शाळेच्या खोलीत चेंडू गेला. त्यानंतर गावातील मुलं चेंडू आणण्यासाठी खोलीत गेले. त्यावेळी त्यांनाी शाळेत हॅंडग्रेनेड बॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मुलांनी ही खळबळजनक माहिती गावातील नागरिकांना आणि उपसरपंच गुलाब पांढरे यांना सांगितली.

Bomb found in school
राज्यपालांना आता कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची गरज; उद्धव ठाकरे काय म्हणाले वाचा...

त्यानंतर पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम यांनी जत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस आणि सांगलीतील बॉम्ब शोधक पथकाने बॉम्ब ताब्यात घेतला. यापूर्वीही २०१७ मध्ये कुडनूर मध्ये दोन बॉम्ब सापडले होते. बॉम्ब शोधक पथक त्यावेळीही दाखल झाले होते. अशीच घटना आताही घडल्याने डफळापुर कुडनूर व जत तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By - Naresh shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com