"Sakinaka बलात्कार प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या!"

भाजपच्या संतप्त महिला कार्यकर्त्यांनी केली मागणी; अंबरनाथमध्ये भाजपकडून ठाकरे सरकारचा निषेध.
"Sakinaka बलात्कार प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या!"
"Sakinaka बलात्कार प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या!"अजय दुधाणे

अजय दुधाणे

अंबरनाथ : मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेसोबत घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. अंबरनाथमध्येही भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेसोबत अत्यंत निर्दयीपणे अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर नाजूक अवस्थेत असलेल्या महिलेच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे देखील पहा :

या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असतानाच अंबरनाथमधील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी या बलात्काराच्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली आहे. ठाकरे सरकारच्या राज्यात राज्यातील महिला असुरक्षित असून आम्हालाही एकटीला घराबाहेर पडायला भीती वाटते, अशी भावना या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

"Sakinaka बलात्कार प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या!"
Nagpur : "तू मोठा की मी मोठा" या वादातून झाला खून!

तसेच, सरकारने या बलात्कार प्रकरणातील आरोपीला तातडीने फासावर लटकवावं, अन्यथा त्याला आमच्या ताब्यात द्यावं, अशी मागणी या महिला कार्यकर्त्यांनी केली. तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लाभलेले दुर्दैवी मुख्यमंत्री असून जे एका महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर तिला बघायला सुद्धा येत नाहीत, मात्र ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात, अशी बोचरी टीका भाजपचे अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजित करंजुले यांनी केली. मुख्यमंत्र्यांना फक्त इतर पक्षातल्या लोकांना शिवसेनेत प्रवेश द्यायला वेळ असून राज्य मात्र असुरक्षित असल्याची टीकाही यावेळी करंजुले यांनी केली.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com