Sambhaji Nagar Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणीचा छळ; भररस्त्यात तरुणीची छेड

Crime News: छत्रपती संभाजीनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. ना कुणाला कायद्याची भीती आहे ना पोलिसांच्या कारवाईची. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Sambhaji Nagar Crime
Sambhaji Nagar CrimeSaam Tv

Chhatrapati Sambhaji Nagar News: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवर होणारे अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता छत्रपती संभाजीन येथून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Sambhaji Nagar Crime
Vande Bharat Express: ‘वंदे भारत’वर झोपडपट्टीवासीयांचा राग! मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या गाडीवर दगडफेक

छत्रपती संभाजीनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. ना कुणाला कायद्याची भीती आहे ना पोलिसांच्या कारवाईची. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बेगमपुरा भागातली घटना आहे. भररस्त्यात तरुणीची छेडछाड करण्यात आलेली आहे.

मुलगी दुसऱ्या मुलासोबत फिरते या संशयावरून काही तरुणांनी एका मुलीचा पाठलाग करून तिला त्रास दिलेला आहे. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ही तरुणी रस्त्यावरून जात असताना काही तरुणांनी तिला छेडण्याचा प्रयत्न केला तिची बॅग खेचण्याचा प्रयत्न केला.

Sambhaji Nagar Crime
Mumbai Crime: मुंबई हादरली! बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याचं भयंकर कृत्य! गाठला कृरतेचा कळस

व्हिडिओमधील दिसत असलेली मुस्लिम मुलगी इतर मुलासोबत फिरते या संशयावरून काही मुलं या तरुणीला त्रास देत आहेत. तू इतर मुलासोबत का फिरत आहे? म्हणून हे मुले तिला त्रास देत होते.

या घटनेबाबत बेगमपुरा पोलिसांनी (Police) पिडीत मुलगी आणि तिचे आई- वडिलांना बेगमपुरा पोस्टे येथे बोलावून तक्रार देणेस सांगीतले असता, त्यांनी तक्रार देणेस नकार दिला आहे. मात्र, या प्रकरणात बेगमपुरा पोलीस पुढील कारवाई करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com