गृहविभागास ४० दिवसानंतर पुन्हा काढावा लागला बदलीचा आदेश; बैजल हजर

गृहविभागास ४० दिवसानंतर पुन्हा काढावा लागला बदलीचा आदेश; बैजल हजर
अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारताना हरीश बैजल.

सोलापूर : शहराचे २० वे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांनी अंकुश शिंदे यांच्याकडून नुकताच पदभार स्वीकारला. शिंदे यांच्या जागेवर ठाणे येथील अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली झाली होती. harish-baijal-solapur-police-commisioner-ankush-shinde-marathi-news-sml80

अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्वीकारताना हरीश बैजल.
पैशाच्या जोरावर भाजप जिंकली; अब्दुल सत्तार

कराळे यांनी सोलापूरला येण्यास अनुत्सुकता दाखवल्याची चर्चा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाेलिस खात्यात हाेती. कराळे देखील साेलापूरला त्यांचा पदभार घेण्यासाठी आले नाहीत. तब्बल ४० दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर पुन्हा गृह विभागाच्यावतीने बदलीचा दूसरा आदेश काढला. या आदेशात पोलिस आयुक्तपदी हरीश बैजल यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

बैजल हे पोलिस उपमहानिरीक्षक (सायबर) पदावर कार्यरत हाेते. त्यांनी बदलीच्या आदेशानंतर साेलापूरात येऊन अंकुश शिंदे यांच्याकडून नुकताच पदभार स्वीकारला.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.