
रणजीत माजगांवकर
Hasan Mushrif News Update : राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल ईडीने छापा टाकला. मुश्रीफ हे कालच्या ईडीच्या छाप्यानंतर नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळत आहे. ईडीच्या बारा अधिकाऱ्यांच्या पथकाने दुसऱ्यांदा हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी देखील हसन मुश्रीफ त्यांच्या निवासस्थानी नसल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना केवळ झडती घेऊन माघारी फिरावं लागलं आहे. (Latest Marathi News)
हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) त्यांच्या विविध कंपन्यांमार्फत झालेल्या कथेत घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडीच्या रडारवर आहेत. दीड महिन्यांपूर्वी हसन मुश्रीफ राहत असलेल्या कागल इथल्या निवासस्थानी ईडीने (ED) छापा टाकून दिवसभर त्यांच्या घराची झाडाझडती घेतली होती. तसेच कुटुंबीयांची देखील कसून चौकशी केली होती.
काल पुन्हा हसन मुश्रीफ यांच्या कागल निवासस्थानावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. छापा पडण्याअगोदर हसन मुश्रीफ आणि त्यांची दोन मुले घरी होती. मात्र ते घराबाहेर पडल्यानंतर अधिकारी त्यांच्या निवासस्थानी पोचल्याच बोलले जाते. कालपासून हसन मुश्रीफ आणि त्यांची दोन्ही मुलं नॉट रिचेबल आहेत.
काल ईडीच्या अधिकाऱ्यांनी हसनमुश्रीफ यांच्या घराची पुन्हा झडती घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ आणि त्यांचे दोन नंबरचे चिरंजीव आबिद मुश्रीफ यांची देखील कसून चौकशी केली आहे.
हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा पडून 24 तास उलटून गेली तरीही हसन मुश्रीफ कोणाच्याही संपर्कात नसल्याचं पाहायला मिळत आहे. उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हसन मुश्रीफ यांना बोलवण्यात आलेला आहे.
हसन मुश्रीफ यांच्यासोबत त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट सुद्धा रडारवर असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे. त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सरसेनापती साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक या संस्थांमध्ये हसन मुश्रीफ यांच्यामार्फत कथित घोटाळा झाल्याची तक्रार ईडीकडे प्राप्त झालेली होती.
तसेच हसन मुश्रीफ यांनी विविध बोगस कंपन्यां मार्फत फसवणूक केल्याचा आरोप ही त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या सर्व प्रकरणांमध्ये हसन मुश्रीफ आणि त्यांच्या दोन्ही मुलांची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र ही चौकशी सुरू झाल्यापासून आता हसन मुश्रीफ नॉट रिचेबल झालेले आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.