Corona Vaccine: दीड वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आजोबांना आज कोविडची लस, नागपुरातील प्रकार

घरच्यांना आजोबांच्या मृत्यूनंतर लसीकरणाचा मॅसेज आल्यावर धक्काच बसला.
Corona
Corona Saam Tv

>> संजय डाफ

नागपूर : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचं लसीकरण सुरु आहे. मात्र नागपुरात कोरोना लसीकरणाचा आश्चर्यचकीत करणारा प्रकार समोर आला आले. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. (Corona Vaccine)

शिवाजी हिरामन डांगे असं दीड वर्षापूर्वी मृत्यु झालेल्या आजोबांचं नाव आहे. नागपूरमधील आरोग्य विभागाने दीड वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या आजोबांना आज लस दिली आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या मेसेजनुसार तरी हेच दिसत आहे. (Maharashtra News)

Corona
अरे ला कारे नं उत्तर द्या, तक्रारी कसल्या करताय?; बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाल्यानंतर अजित पवार संतापले
Corona
Video: शिवरायांच्या पुतळ्याच्या लाईटसाठी मला कपडे विकावे लागतील; आमदार संतोष दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल

दीड वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या नागपूर आजोबांचं कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये लसीकरण झालं आहे. घरच्यांना आजोबांच्या मृत्यूनंतर लसीकरणाचा मॅसेज आल्यावर धक्काच बसला.

कुटुंबाला हसावं की रडावं असा प्रश्न पडला. प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे समोर आला आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी कुटुंबियांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com