"कोरोनाची चौथी लाट आली तर...", आरोग्यमंत्री स्पष्टच बोलले

Rajesh Tope : लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सातव्या स्थानी असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे
Rajesh Tope
Rajesh TopeSaam Tv News

जालना: सध्या मास्क घालणं बंधनकारक केलेलं नाही. मात्र भविष्यात कोरोनाची (Corona) रुग्ण संख्या न वाढता कमीच राहिली, तर मास्क मुक्तिबाबत मुख्यमंत्री (State Government) पातळीवरुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. राज्यात 15 ते 17 वयोगटातील मुलांचं चांगल्या प्रकारे लसीकरण होत असून मुलांच्या लसीकरणाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र 13 व्या स्थानी असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. राज्यात 70 टक्के लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असून लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात सातव्या स्थानी असल्याचं टोपे यांनी सांगितलं आहे. (Corona Virus Latest Updates In Maharastra)

18 पेक्षा अधिक वयोगटातील मुलांच्या लसीकरणात वाढ होण्याची गरज असून राज्यातील जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकाऱ्यांना याबाबतीत सूचना दिली असल्याची माहितीही टोपे यांनी दिली. जून जुलै महिन्याच्या दरम्यान चौथी लाट आली तर लसीकरणच नागरिकांसाठी आधार ठरू शकतं असा अंदाज देखील टोपे यांनी व्यक्त केला. केंद्राकडे प्रिकोरेशन डोससाठी आर्थिक मदत करण्याची मागणी देखील करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच याबाबतीत राज्याकडून योग्य निर्णय घेण्यात येईल, असं सांगत सर्वांना बूस्टर डोस घेणं बंधनकारक नाही असंही टोपे म्हणाले. जालना जिल्ह्यात असलेल्या बोगस डॉक्टरांवर एका महिन्यात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील टोपे यांनी दिलं आहे.

जालना जिल्ह्यात मुलं-मुलींच्या जन्मदरात मोठी तफावत असून पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल. कुणालाही याबाबतीत पाठीशी घालणार नाही. असं सांगत या कायद्याची जिल्ह्यात कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश टोपे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यात आरोग्य विभागाची भरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही फेक कॉल असतील तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याची चौकशी करून कारवाई करतील असंही टोपे म्हणाले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com