Covid 19 चा धाेका वाढला, साता-यानंतर महाराष्ट्रात मास्क सक्तीचं होणार?; आरोग्यमंत्री म्हणाले...

यापुर्वी काेराेनाची लाट आल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सातारा जिल्हा हिट लिस्टवर होता.
Satara, Covid-19, Coronavirus, Tanaji Sawant
Satara, Covid-19, Coronavirus, Tanaji Sawantsaam tv

Tanaji Sawant News : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे चित्र आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज (मंगळवार) दुपारी12 वाजेपर्यंत जिल्ह्यात तब्बल 57 संशयित रुग्णांचा कोरोनाचा (satara covid 19 marathi news) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. साेमवारी उपचारार्थ दाखल असणाऱ्या दोघांचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. (Breaking Marathi News)

Satara, Covid-19, Coronavirus, Tanaji Sawant
Shri Sant BaluMama Trust News : कोल्हापूरातील राड्यानंतर संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या कार्याध्‍यक्ष निवडीवर झाला महत्त्वपुर्ण निर्णय

जिल्ह्याचा कोरोना बाधितांची टक्केवारी 9.95 टक्के इतकी आहे. तर मृत्यू दर हा 2.40 टक्के इतका असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान दाेन बाधितांचा मृत्यू झाल्याने सातारा जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील बँक, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय विभाग अधिकारी व कर्मचारी यांना मास्कचा दैनंदिन वापर सक्तीचा केला आहे. तसेच सार्वजनिक आणि गर्दीच्या ठिकाणावर नागरिकांनी स्वतः मास्कचा वापर करावा असे आदेश साताऱ्याचे जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी काढले आहेत.

Satara, Covid-19, Coronavirus, Tanaji Sawant
Pandharpur News : राष्ट्रवादीशी जवळीक असणारा कार्यकर्ता पक्षाच्या नेत्याशी घेणार पंगा, फुंकले रणशिंग

यापुर्वी काेराेनाची लाट आल्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सातारा जिल्हा हिट लिस्टवर होता. त्यावेळी जिल्ह्यात बधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण सुध्दा अधिक होते. या सर्वबाबी डोळ्यासमोर ठेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्तीचा आदेश काढला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यात सध्या मास्कसक्तीची परिस्थिती नाही. मात्र स्थानिक ठिकाणी परिस्थिती बघून जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्तीचा निर्णय घेतला आहे असे मत साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com