साता-यात वैद्यकीय अधिका-यांनी तृतीयपंथीयांपुढे हात जाेडले

Civil Hospital Satara
Civil Hospital Satara

सातारा : येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात तृतीयपंथीयांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे शहरातील तृतीयपंथीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक civil surgeon यांच्या दालनात आज (बुधवार) गोंधळ घातला. वैद्यकीय अधिका-यांनी माफी मागितल्यानंतर प्रकरणार पडदा पडला. (health-officer-apologize-transgender-satara-marathi-news)

या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे औषधोपचारासाठी गेल्यानंतर तृतीयपंथीयांना जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक दिल्याने सातारा शहरातील तृतीयपंथी एकत्र आले. न्याय मिळावा यासाठी सा-या तृतीयपंथीयांनी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी डाॅ. चव्हाण यांच्या दालनात समस्येबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान तृतीयपंथीयांचे वैद्यकीय अधिका-यांच्या उत्तरामुळे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी न्याय हक्कासाठी डाॅ. चव्हाण यांच्या दालनातच मोठा गोंधळ घालण्यास प्रारंभ केला.

Civil Hospital Satara
नाद खूळा; प्रद्युम्नची स्कॉटिश घाेडेसवारी अजिंक्यपदसाठी निवड

अखेरीस डाॅ. चव्हाण यांच्या दालनातच संबंधित वैद्यकीय अधिका-यांनी तृतीयपंथीयांची हात जोडून माफी मागितली व येथून पुढे माझ्याकडून असे घडणार असे अभिवचन दिले. त्यानंतर या सर्व प्रकरणावर पडदा पडला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com