सांगलीत भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये महासभेत हमरीतुमरी

मिरजेतील अपेक्स केअर रुग्णालयातील 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणाचे पडसाद सांगली महापालिकेच्या महासभेत उमटले. आयुक्तांवरील कारवाईच्या मागणीवरून भाजपाचे नगरसेवक आणि सत्ताधारी काँग्रेस नगरसेवक यांच्यामध्ये चांगलीचं जुंपली होती
सांगलीत भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये महासभेत हमरीतुमरी
सांगलीत भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये महासभेत हमरीतुमरी- Saam TV

सांगली : मिरजेतील Miraj अपेक्स केअर रुग्णालयातील 87 कोरोना Corona रुग्ण मृत्यू प्रकरणाचे पडसाद सांगली महापालिकेच्या महासभेत उमटले. आयुक्तांवरील कारवाईच्या मागणीवरून भाजपाचे BJP नगरसेवक आणि सत्ताधारी काँग्रेस Congress नगरसेवक यांच्यामध्ये चांगलीचं जुंपली होती. भाजप नगरसेवक धीरज सूर्यवंशी आणि काँग्रेसचे नगरसेवक अभिजित भोसले यांच्यात भर सभेत हमरीतुमरीचा प्रकार आज घडला. Heated exchange of words between Shivsena and Bjp in Sangli

मिरजेच्या अपेक्स केअर कोरोना रुग्णालयातल्या 87 कोरोना रुग्ण मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज सांगली महापालिकेच्या पार पडलेल्या महासभेत जोरदार उमटले. सुरुवातीला भाजपने आक्रमक भूमिका घेत आयुक्त आणि आरोग्य अधिकार्‍यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी तिरडी मोर्चा काढला होता.

हे देखिल पहा

या आंदोलनानंतर सुरू असलेल्या महासभेत भाजपा नगरसेवक आणि काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मध्ये चांगलीच जुंपली. भाजपाचे नगरसेवक माजी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी काँग्रेसचे नगरसेवक अभिजीत भोसले यांच्यावर आयुक्तांची पाठराखण करत असल्याचा आरोप केला. Heated exchange of words between Shivsena and Bjp in Sangli

सांगलीत भाजप आणि काँग्रेस नगरसेवकांमध्ये महासभेत हमरीतुमरी
भाजपमध्ये संशयकल्लोळ : मुरकुटेंची मंत्री गडाखांसोबत हातमिळवणी

यानंतर भाजपा नगरसेवक सूर्यवंशी आणि भोसले यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी भाजपचे नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांनी भोसले यांना एकेरी भाषेचा वापर करत आयुक्तांची बाजू कशा साठी घेत आहेस.. तूअपेक्स हॉस्पिटलमध्ये भागीदार आहेस का ? असा सवाल केला. त्यामुळे काही काळ सभागृहांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर यांनी मध्यस्थी करत या प्रकरणावर पडदा टाकला.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com