अमरावतीत मुसळधार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १२ दरवाजे उघडले

वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ
अमरावतीत मुसळधार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १२ दरवाजे उघडले
अमरावतीत मुसळधार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १२ दरवाजे उघडलेअरुण जोशी

अमरावती : उर्ध्व (अप्पर) वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मागील ४ तासांत मोठया ४५३ क्युमेक्सने पाणी येत असल्यामुळे रात्री ८.०० वाजता प्रकल्पाचे एकूण ७ दरवाजे ३५ सेमीने उघडण्यात आले होते. मात्र, सकाळी ७ वाजताच्या सुमारास आणखी ५ दरवाजे ११० से.मी. ने उघडण्यात आले.

हे देखील पहा-

त्यामुळे आता धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून ४०० घमी प्रतिसेकंद विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या गावातील लोकांना सावधगिरी बाळगण्याबाबत आवाहन कार्यकारी अभियंता उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभाग, अमरावती यांनी केले आहे. अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बगाजी सागर धरणाचे ३१ दरवाजे उघडले आहेत.

अमरावतीत मुसळधार पाऊस; अप्पर वर्धा धरणाचे १२ दरवाजे उघडले
हतनूर धरणाचे १४ दरवाजे पूर्ण उघडले

जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. बुधवारी देखील शहरासह जिल्ह्याला दुपारी ३ वाजेपासून मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाले भरले आहेत. यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहनांमध्ये पाणी जाऊन ते बंद पडले. जिल्ह्यात अमरावती, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदी- नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com