बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पाणी (पहा व्हिडिओ)
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पाणी (पहा व्हिडिओ)विनोद जिरे

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पाणी (पहा व्हिडिओ)

काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस बरसला

बीड - जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने Rain हजेरी लावली आहे. रात्रीपासून मेघगर्जनेसह जिल्ह्यात धुवाधार पावसाने कमबॅक केले. काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पाऊस बरसला आहे. बीड, गेवराई, शिरूर कासार, अंबाजोगाई, वडवणी, केज, माजलगाव या तालुक्यांसह सर्वच तालुक्यांना पुन्हा एकदा पावसाने झोडपले आहे.

हे देखील पहा -

रात्रभर झालेल्या मोठ्या पावसामुळे सिंदफणा,कर्नल यासह अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे गावखेड्यांचा संपर्क देखील तुटलेला आहे. नदी, नाले, ओढे, दुथडी भरून वाहू लागले आहेत. तर अनेक नदी, ओढ्याचे पाणी, शेतकऱ्यांच्या पुन्हा पिकांमध्ये घुसले आहे. त्यामुळे शेत पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. एकूणच जिल्ह्यामध्ये रात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com