गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी

किनारपट्टी भागात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी
गोव्यात आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारीSaam Tv

पणजी: अरबी समुद्र (Arabian Sea) आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी (Andhra Pradesh Coastal area) भागात निर्माण झालेले वातावरणीय टर्फ मुळे आज गोव्यासह कोकण किनारपट्टी भागात अतिवृष्टी आणि मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने व्यक्त केली आहे. यासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

वातावरण बदलामुळे गोव्यात गेल्या आठवड्यापासून मान्सून सक्रिय झाला असून मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या चोवीस तास 89 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून उद्या 150 ते 200 मिलिमीटर पावसाचे शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. पावसाचे हे मुसळधार अतिवृष्टी स्वरूप असणार आहे.

गोव्यातल्या पणजी, मडगाव, वाळपई , काणकोण, सांगे, मध्ये मुसळधार पाऊस पडत असून महाराष्ट्राच्या हद्दीला लागून असणाऱ्या पेडणे भागात सर्वाधिक एक 190 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गोव्यात आत्तापर्यंत 1740 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस मागील वर्षांपेक्षा 170 मिलिमीटर सरप्लस आहे. मुसळधार पावसामुळे वास्को, पणजी, सह अनेक मोठ्या शहरांमध्ये पाणी साचले असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तर दुसरीकडे पावसाची संततधार सुरूच आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com