
Ratnagiri News : रत्नागिरीत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गाला (mumbai goa highway latest marathi news) बसू लागला आहे. सततच्या पावसामुळे परशुराम घाटातील (parshuram ghat) मातीचा ढिगारा रस्त्यावर आला आहे. परिणामी महामार्गावरील वाहतुक एकेरी स्वरुपात सुरु आहे. (Maharashtra News)
रत्नागिरी येथे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणा-या वाहनधारकांना बसला आहे. चिपळूणमधील (chiplun) परशुराम घाटात दरड कोसळली (landslide in parshuram ghat) आहे. पावसामुळे घाटातील माती ही रस्त्यावर आल्यानं वाहतूकीसाठी अडथळा निर्माण झाला आहे.
परशुराम घाटात लहान लहान दगड खाली येत आहेत. त्यामुळं या घाटातील वाहतूकही धीम्यागतीनं एकेरी पद्धतीने सुरु आहे.
दरम्यान गणेशोत्सव (ganesh festival 2023) तोंडावर आला आहे. काेकणातील चाकरमानी आपल्या गावी निघण्याच्या तयारीत आहेत. एकीकडे महामार्गावरील एक लेन पुर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे तर दूसरीकडे चिपळूणचा घाट हा मार्गावरील धोकादायक ठरताना दिसत आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.