लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी भागात ढगफुटी !

औराद शहाजनी येथे 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी भागात ढगफुटी !
लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी भागात ढगफुटी !दीपक क्षीरसागर

लातूर : गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी गावासह 20 गावाच्या शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे या गावातील शेतशिवारात मोठ्याप्रमाणावर पाणी जमा झाले आहे. तर अनेक शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. Heavy rain in Aurad Shahjani area of Latur

हे देखील पहा -

आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास औराद शहाजनी गावालगत बोरसुरी तगरखेडा सावरी या गावासह जवळपास 20 गावाच्या शेतशिवारात चार ते पाच अश्या एक तासात प्रचंड प्रमाणात पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी भागात ढगफुटी !
पलुस कडेगाव मध्ये भाजपला खिंडार !

एकट्या औराद शहाजनी येथे 50 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर लगतच्या गावशिवारात यापेक्षा पाऊस झाला अशी माहिती मिळत आहे. औराद शहाजनी गावालगत तेरणा नदी वाहत असून सध्या हि नदी ओसंडून वाहत आहे. औराद शहाजनी गाव जलमय बनल्याचे चित्र असून रस्त्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com