मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीचे रस्ते झाले जलमय!

दोन दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीचे रस्ते झाले जलमय!
मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीचे रस्ते झाले जलमय!ओंकार कदम

सातारा - दोन दिवसांपासून महाबळेश्वर शहर व परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवार पर्यंत या परिसरात २२९४.० मि.मी ( ९० इंच ) पावसाची नोंद झाली होती. मुसळधार पावसाने महाबळेश्वर पांचगणी मुख्य रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक मंदावली होती. तर काही काळ वाहतूक थांबवायला देखील लागली.

हे देखील पहा -

सतत पडणाऱ्या पावसाने सध्या येथील जनजीवन वीस्कळित झाले आहे. महाबळेश्वर मधील प्रसिद्ध असलेला वेण्णालेक तलाव आता या पावसाने भरून वाहू लागल्याने त्याचे पाणी रस्त्यावर आले आहे.

मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीचे रस्ते झाले जलमय!
अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी !

या पाण्यामुळे आज महाबळेश्वर कडून पाचगणी कडे जाणार रस्ता काही काळापुरता बंद करण्यात आला होता तर इतर ठिकाणी सुद्धा वाहतूक धीम्या गतीने सुरू होती या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com