
सागर निकवाडे
Flood In River : नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस पार गेलाय. मात्र कडाक्याच्या उन्हाळ्यातही अवकाळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील रापापुर येथील नदीला पूर आला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. आज दुपारपासून नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा धडगाव अक्कलकुवा आणि शहादा तालुक्यातील अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. (Unseasonal Rain)
पावसामुळे लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आला आहे. चक्क उन्हाळ्यात नदीला पूर आल्याने नागरिकांनी नदीचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती. नदीच्या आलेल्या पुरामुळे या परिसरात झालेल्या पावसाचा अंदाज आपल्याला आलाच असेल.
अवकाळी पाऊस आणि गारपोटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारने अगोदरच झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. मात्र मदतीसंदर्भात अजूनही ठोस भूमिका नाही.अशात आज झालेल्या पावसामुळे शेतकरी उध्वस्त झाल्याचे चित्र सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये दिसत आहे.
नागपुरात मुसळधार पावसाच्या सरी
नागपूर (Nagpur) शहरात आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली.दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी पावसामुळे नागपूर शहरात अनेक झाडे कोसळली होती. तर शहरात अनेक भागात 12 तास वीज पुरवठा खंडित होता.आजही पावसाने अचानक हजेरी लावली. काही भागात हलक्या स्वरूपाची गारपीट देखील झाल्याची माहिती आहे. सोमवारपर्यंत हवामान खात्याने विदर्भातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.