गडनदीची पाणी पातळी वाढली; कोंडीवरे पूलावरील वाहतूक बंद

गडनदीची पाणी पातळी वाढली; कोंडीवरे पूलावरील वाहतूक बंद
gad river

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वच भागातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. पावसाचा सर्वाधिक जोर असलेल्या संगमेश्वर येथील गडनदी gad river रात्रभर पातळी सोडून वाहत होती. परिणामी माखजन बाजारपेठे पुराचे पाणी शिरले होते. (heavy-rainfall-in-ratnagiri-kondvari-bridge-gad-river)

आज (साेमवार) सकाळपासून पावसाने पुन्हा काही काळ उसंत घेतल्यामुळे गड नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तरी कळंबुशी,नायशी, वडेर या गावांना जोडणारा कोंडीवरे येथील पूल अद्यापही पाण्याखाली असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद आहे.

gad river
मी आज फार आनंदित झालाेय : नारायण राणे

पावसाचा जोर आज (साेमवार) कायम राहिल्यास जिल्ह्यातील अनेक भागात नद्या पातळी सोडून वाहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनेक दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाचे दमदार आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com