निर्मला नदीला पूर; सिंधुदुर्गातील 27 गावांचा संपर्क तुटणार?

निर्मला नदीला पूर; सिंधुदुर्गातील 27 गावांचा संपर्क तुटणार?
nirmala river

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग sindhudurg येथे मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाला rain सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये पंधरा दिवस विश्रांती घेतल्यानंतर आजपासून (साेमवार) जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे रखडलेली शेतीची कामे मार्गी लागतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला nirmala river पूर आला आहे. यामुळे 27 गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (heavy-rain-in-sindhudurg-flood-situation-nirmala-river)

रात्रभर पडत असलेल्य़ा पावसामुळे नद्याच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. याबराेबरच कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये मुसळधार तर देवगड, वैभववाडीत संततधार पाऊस सुरु आहे. रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

nirmala river
बॅंकांना धडाधड नाेटीसा; पुणे जिल्हा बॅंकेने ईडीला दिले उत्तर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आला आहे. परिणामी आंबेरी पुलावर पाणी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटेल अशी भिती व्यक्त केली जात आहे. वाढत्या पाण्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

गेल्या 15 दिवसानंतर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे त्याचप्रमाणे शेती सुध्दा पाण्याखाली गेली आहे. दरम्यान खारेपाटण बाजारपेठेत पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे बाजारपेठेतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक दुकानदारांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com