लासूर स्टेशन परिसरात दमदार पाऊस; पावसामुळे वाहतूक खोळंबली

गुडघाभर पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली तर तब्बल तीस वर्षांनी अशी पूरपरिस्थिती ओढवली आहे.
लासूर स्टेशन परिसरात दमदार पाऊस; पावसामुळे वाहतूक खोळंबली
लासूर स्टेशन परिसरात दमदार पाऊस; पावसामुळे वाहतूक खोळंबली डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर Vaijapur तालुक्यातल्या लासूर Lasur स्टेशन परिसरात रात्री दमदार पाऊस Rain झाला असून लासूरगाव येथून वाहणारी शिवनानदी दुथडी भरून वाहत आहे. नदीवरील फरशी पुल दिसत नाही तर मुंबई Mumbai महामार्गावरील पुलावरूनही गुडघाभर पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली तर तब्बल तीस वर्षांनी अशी पूरपरिस्थिती ओढवली आहे. देवी दाक्षायणी मंदिर, महादेव मंदिर, गणपती मंदिराला पाण्याचा वेढा असून वेशीतील मारुती मंदिराला पाणी लागले तर महादेव मंदिर पाण्याखाली गेले आहे.

हे देखील पहा -

लासूर स्टेशन परिसरात गेल्या दोन दिवसांत दमदार पाऊस झाला असून लासूरगावच्या शिवना नदीला पाणी आले असून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या दरम्यान नदीवरील फरशी पुलावरून पाणी वाहत असून पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वाहतूक बंद आहे.लासूरगावासह अमानतपुरवाडी, राहेगाव, भायगाव, उंदिरवाडी, धोंदलगाव आदी गावांचा लासूर स्टेशनशी संपर्क तुटला असून नदीकाठी असलेल्या दाक्षायणी देवीच्या मंदिर परिसर पाण्यात आहे तर गावात वेशीपर्यंत पाणी पोचले असून मारुती मंदिर, महादेव मंदिराला पाण्याने वेढा घातला आहे.

लासूर स्टेशन परिसरात दमदार पाऊस; पावसामुळे वाहतूक खोळंबली
नागपूरात निर्बंध कडक करण्यावर व्यापारी संतप्त; आंदोलनाचा इशारा

फरशी पुलावरून पाणी असल्याने पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे आल्या पावली परतून तब्बल सहा किलोमीटर फेरा मारून मुंबई महामार्गावरील पुलावरून लासुरगावात जावे लागेल.यासाठी यावे लागत आहे. या फरशी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी कित्येक वर्षापासून करण्यात येत असून काही वर्षापूर्वी याठिकाणी बंधारा उभारून त्यावरून रस्ता करण्याच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली होती परंतु पुढे कोणतीही हालचाल झाली नाही परिणामी  पुलावरून पाणी आल्यास वाहतुकीचा खोळंबा होतो.नदीच्या पैलतीरी असणाऱ्या जिल्हा परिषद प्रशालेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचीही येण्यासाठी गैरसोय होते.परिसरातून वाहणाऱ्या शिवना आलेल्या पाण्यामुळे विहिरींची पाणीपातळी वाढली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com