शहादा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी; शहरातील सखल भागा जलमय
शहादा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी; शहरातील सखल भागा जलमयदिनू गावित

शहादा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी; शहरातील सखल भागा जलमय

पावसामुळे नगरपालिकेचा कारभार समोर आला आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात रात्री झालेल्या पावसाने Rain शहादा, धडगाव व तळोदा तालुक्यात जोरदार हजेरी लावली. शहादा शहरात मुसळधार पावसामुळे जुने पोलीस स्टेशन Police Station, उपविभागीय कार्यालय, डोंगर रोड, सत्र न्यायालय परिसरात जलमय परिस्थिती झाली. शासकीय कार्यालयांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे ओली झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नंदुरबार Nandurbar जिल्ह्यात या पावसाळ्यात दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा होती.

हे देखील पहा -

सातपुड्यातील धडगाव तालुका व शहादा शहरात जोरदार पाऊस झाला तर नवापूर नंदुरबार या तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. शहादा शहरातील सप्तशृंगी मंदिर परिसरात एक मोठे झाड कोसळल्याने एक मोटर सायकलवर कृषी दुकानाच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. सोबत शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणत पाऊस झाल्याने अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.

शहादा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी; शहरातील सखल भागा जलमय
Beed: आईसह 2 चिमुकल्या मुलींना सर्पदंश; दोन्ही मुलींचा मृत्यू!

पावसामुळे नगरपालिकेचा कारभार समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वीही शहादा न्यायालयाच्या परिसरात पाणी भरल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला उपाययोजना करण्याचा आदेश देण्यात आले होते. मात्र दोन वर्षांनी पुन्हा जलमय स्थितीची पुनरावृत्ती झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com