मुसळधार पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पाणी

शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पाणी
मुसळधार पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पाणी
मुसळधार पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पाणीओंकार कदम

सातारा : मागील २ दिवसांपासून मेढा Medha- जावळी Jawali भागात पावसाचा Rain जोर चांगलाच वाढत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे केळघर या ठिकाणील ओढ्याला पूर आला आहे. ओढ्याच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. केळघर Kelaghar येथील ओढा पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे. यामुळे वाहतूकीसाठी पर्यायी रस्ता बनवला आहे.

हे देखील पहा-

परंतू, ओढ्याच्या पाणीपातळी मध्ये वाढ झाल्याने, आणि पर्यायी रस्त्याला लावलेल्या मोऱ्या अपूऱ्या असल्याने, शेजारी असणाऱ्या शेतांमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरले आहे. ही शेती Agriculture दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहे. मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे farmers मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांच्या शेतात घुसले पाणी
रत्नागिरीमध्ये पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा

पावसाचा जोर असाच जर राहिला, तर रात्री केव्हाही पर्यायी रस्ता वाहून जाण्याची शक्यता आहे. मेढा पोलीस Police आणि बांधकाम Construction विभागाने या रस्त्यावरील वाहतूक आंबेघर- डांगरेघर- पुनवडी मार्गे नांदगणेवरुन महाबळेश्वर अशी वाहतूक वळवण्यात आली आहे. लोकांची देखील या पाऊसाने Rain चांगलीच तारांबळ उडाली आहे. नदीवर पाण्याचे पूर वाहत असतानाची दृश्ये पाहायला मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com