
- सचिन कदम
रायगड : रायगड (raigad) जिल्ह्यातील पाली, नागोठणा, रोहा परिसरातुन वाहणाऱ्या कुंडलिका आणि खालापुरमधुन वाहणाऱ्या पाताळगंगा या नद्यांनी (river) आज (गुरुवार) सकाळपासुन धोक्याची पातळी ओलांडली आहे. खालापुर परीसरात जोरदार पाऊस कोसळत असल्याने या दोन नद्या इशार पातळी ओलांडून वाहत असुन परिसरात पुरसदृष्य (floods) परीस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने पाली, नागोठणे, रोहा परीसरातील नदी किनारी राहणाऱ्या जनतेस आणि गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (raigad rain updates in marathi)
सावित्री नदीत एनडीआरएफचं (NDRF) बचाव प्रात्याक्षिक
महाडमध्ये येणाऱ्या पुराच्या पार्श्वभुमीवर नागरिकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण आहे. आपत्कालीन परीस्थितीत बचाव आणि मदत कार्यासाठी महाड (mahad) आणि पोलादपुरमध्ये (poladpur) येथे दोन एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या पथकाने महाडच्या सावित्री नदी (Savitri River) पात्रात बचाव कार्यचे प्रात्याक्षिक केले.
पेणच्या मच्छीमाराचा उरणला सापडला मृतदेह
पेण तालुक्यातील लक्ष्मण चौरे हे मच्छीमारीसाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बेपत्ता झाले होते. या घटनेच्या दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह उरण येथे सापडला. दरम्यान अणखी एक मच्छीमार बेपत्ता असल्याचे प्रशासनाने सांगितलं. त्यांचे दौलत पवार असे नाव आहे.
रेड अलर्ट अन् प्रशासन सज्ज
हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिला असला तरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कमी असल्याचं दिसून येत आहे. अलिबागसह जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असून पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान खात्याने रायगडला रेड अलर्ट दिल्याने प्रशासन सर्व तयारीनिशी सज्ज आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.