Kalyan Station : मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळावर साचलं पाणी; स्टेशनवर प्रवाशांची गर्दी

कल्याण स्टेशन परिसरातही रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. तर लोकल ट्रेन देखील १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
kalyan rain news
kalyan rain newssaam tv

kalyan News : मुंबई आणि परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे . मुसळधार पावसामुळे मुंबईची लोकल ट्रेन विस्कळीत झाली आहे. पावसामुळे मुंबई, ठाणे, कल्याण भागात रत्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. तर कल्याण (Kalyan) स्टेशन परिसरातही रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. तर लोकल ट्रेन देखील १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे कल्याण स्टेशनवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

kalyan rain news
डेंगू, मलेरियाने केला हाहाकार; लहान मुलांना रूग्णालयात जागा मिळेना

कल्याण परिसरात आज सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती. सकाळपासून पडणारा पाऊस दुपारच्या सुमारास उसंत घेतली आहे. मागील ७ तासात ठाण्यात ९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सकाळपासून पडणार्‍या पावसाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे शहरात १० ठिकाणी पाणी साचले होते .तसेच कल्याण शहरात १२ ठिकाणी झाड पडल्याची घटना घडली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे स्टेशनजवळी रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे अजून देखील १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. तर घोडबंदर रोड अणि नाशिक रोडवरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

kalyan rain news
दप्‍तराविना विद्यार्थी जाणार शाळेत; कशी असेल दफ्तरमुक्त शाळा वाचा...

कल्याण पश्चिम येथील वालधुनी नदीची पातळी वाढल्याने वालधूनी नदीच्या परिसरात असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. तर कल्याण पश्चिमेला चिकनघर येथील संत तुकाराम नगर मधील ३०-३५ घरात पाणी शिरले आहे.

शहापूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

शहापूर तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने भातसा धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे भातसा धरणाचे ५ दरवाजे १.२५ मीटरने उघडले आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भातसा नदी काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा नदीवरील शहापूर तालुक्यातील सापगाव पूल तर कल्याण तालुक्यातील खडवली गावाचा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com