अतिवृष्टीने पारनेरची वाताहत, दोन पूल गेले वाहून

पारनेरमध्ये अतिवृष्टीमुळे शेत आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.
पारनेरमध्ये अतिवृष्टीमुळे शेत आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.

अहमदनगर - पारनेर तालुक्याच्या पश्चिम भागात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात बऱ्याच ठिकाणी घरांची पडझड झाली तर काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले आहे. शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी वर्ग जरी सुखावला असला तरी सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. शेतात असलेल्या बाजरी व सोयाबीन पिकावर वरुण राजा बरसत आहे. काढणीला आलेले बाजरी पीक सध्या अडचणीत सापडले आहे.Heavy rains cause severe damage in Parner taluka abn79

पारनेरमध्ये अतिवृष्टीमुळे शेत आणि पूल पाण्याखाली गेले आहेत.
तरूणाईला मिळणार रोहित पवारांमुळे "बळ"

पश्चिम पारनेर भागातील अळकुटी, कळस, म्हस्केवाडी, चोंभूत, लोणीमावळा ह्या भागात कमी पाऊस झाल्याने बाजरी, सोयाबीन व मका ह्या पीक लागवडीवर मोठा परिणाम झाला. हाती आलेले पीक अति पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. पश्चिम पारनेर भागातील अळकुटी, कळस, म्हस्केवाडी, चोंभूत, लोणीमावळा परिसरात मुसळधार पाऊस झाला. ऊस पिकासाठी मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ढवळपुरी, वनकुटे परिसरात मोठे नुकसान झाले. काळू नदीवरील दोन वाहून गेल्याने वनकुटे आणि ढवळपुरीदरम्यानचा संपर्क तुटला आहे.

रस्तेच वाहून गेल्याने दळणवळण व्यवस्थाच राहिलेली नाही. घरांची पडझड झाल्याने लोकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतमालाचेही नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळवून द्यावी, अशी मागमी आत्मा समितीचे अध्यक्ष तथा वनकुटेचे सरपंच अॅड. राहुल झावरे यांनी केली आहे.Heavy rains cause severe damage in Parner taluka abn79

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com