दमदार पावसाने चंद्रभागा नदीला पूर

बाबळी ते बनोसा या दोन गावांना जोडणारा पूल नव्याने उभारला जात असून त्या पुलाची उंची या पुराने गाठली आहे.
दमदार पावसाने चंद्रभागा नदीला पूर
दमदार पावसाने चंद्रभागा नदीला पूरअरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती - गेल्या दोन दिवसात झालेल्या दमदार पावसाने दर्यापूर Daryapur तालुका जलमय झाला आहे. तालुक्यातील चंद्रभागा नदीला Chandrabhaga River पहिल्यांदाच या वर्षी पूर Flood आल्याचे चित्र आज सकाळी पाहावयास मिळाले. बाबळी ते बनोसा या दोन गावांना जोडणारा पूल नव्याने उभारला जात असून त्या पुलाची उंची या पुराने गाठली आहे. सर्वत्र पाणीच पाणी दिसू लागले आहे. या चंद्रभागा नदीला भुलेश्वरी नदी जोडली गेल्याने पुरात आणखीच भर पडली आहे. Heavy rains flood Chandrabhaga river

हे देखील पहा -

गेल्या दोन दिवसांपासून दर्यापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी साचले. विशेषता पुनर्वसन परिसरातील घरे पाण्याखाली आली आहे. त्याचे कारण म्हणजे रोड व नाले तयार नसल्याने त्याची झळ पुनर्वसन वासियांना चांगलीच बसली आहे. दमदार झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून शेतीच्या कामाने आता जोर धरला आहे.

दमदार पावसाने चंद्रभागा नदीला पूर
पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिषी रघुनाथ युमालांना अटक

दर्यापूर तालुका हा खारपान पट्टा आहे त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच या भागातील शेती अवलंबून आहे. आमदार बळवंत वानखडे तसेच तहसीलदार यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाला भेट दिली असून नुकसानग्रस्त घरांना तातडीने मदत करण्याचे निर्देश ही आमदार बळवंत वानखडे यांनी दिले आहेत.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com