पाऊस आला परतून; कुठे संततधार, कुठे मुसळधार

पाऊस आला परतून; कुठे संततधार, कुठे मुसळधार
नगरमध्ये जोरदार पाऊस

नगर ः जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची प्रतीक्षा आहे. सुरूवातीला मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार होती. या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. नंतर मात्र, त्याने दडी मारली. आता दुबार पेरणीचे संकट ओढावते की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. आज जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपाविषयी आशा पल्लवित झाल्या आहेत.

नगर शहरातही अनेक दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आणि दुपारी पावसाला सुरुवात झाली. उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी अचानक आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. (Heavy rains in Ahmednagar city)

नगरमध्ये जोरदार पाऊस
नारायण राणे यांच्यासह नवनिर्वाचित मंत्र्यांनी स्वीकारला कार्यभार

या पावसाने शेतकरी वर्गात थोड्या फार प्रमाणात समाधान व्यक्त केलं जातंय. अहमदनगर शहरातील नागरिकांना मात्र रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि त्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. नगर-कल्याण रोडवर तर अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना वाहन चालवताना चांगलाच मनस्ताप होतोय. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी आता तेथील नागरिक करताहेत. सायंकाळी चारच्या सुमारास सुरू असलेला पाऊस दीड तास सुरू होता.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com