नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी; पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा- प्रा. शिवाजी मोरे

नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 10, 11 व 12 जुलै रोजी अतिवृष्टी झाली आहे. ढगफुटी झाली आहे. अनेक शेतांमध्ये तलावाचे, नद्यांचे रुपांतर झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी; पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा- प्रा. शिवाजी मोरे
प्रा. शिवाजी मोरे

नांदेड : सोनखेडसह नांदेड जिल्ह्यात 31 मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करून सामुदायिक पंचनामा करण्याचे आदेश राज्य प्रधानमंत्री पीकविमा समितीचे अध्यक्ष मुख्य सचिव व इफ्को- टोकियो विमा कंपनीला देण्यात यावेत, या मागणीचे निवेदन मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये मागील 10, 11 व 12 जुलै रोजी अतिवृष्टी झाली आहे. ढगफुटी झाली आहे. अनेक शेतांमध्ये तलावाचे, नद्यांचे रुपांतर झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग, पिकासह जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातल्या 80 मंडळांपैकी 31 मंडळांमध्ये सोनखेडसह ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक मंडळांमध्ये हवामान केंद्र ऑटोमॅटिक बसवलेले आहेत. त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग घेऊन राज्याचे मुख्य सचिव जे राज्य विमा समितीचे अध्यक्ष आहेत व नांदेड जिल्ह्यातली इफ्को-टोकियो विमा कंपनी आहे. या विमा कंपनीने विमा काढलेला आहे, त्यामुळे जिल्ह्यात शेतकर्‍यांचे वैयक्तिक पंचनामे करण्यापेक्षा सामुदायिक पंचनामे करण्याचे आदेश त्यांना द्यावेत.

हेही वाचा - एसीबी करणार परमबीर सिंगविरोधात खुली चौकशी; गृहविभागाची परवानगी

कारण डेल्टा प्लस धोका लक्षात घेता व विमा कंपनीकडे असलेला अपुरा कर्मचारीवर्ग व अपुरा तांत्रिकवर्ग तसेच विमा कंपनीला तक्रार करणारी ई- मेल बंद आहे, अशा अनेक कारणांमुळे शेतकर्‍यांच्या नुकसानीच्या हक्काचे संरक्षण होत नाही, अशी तक्रार अनेक शेतकर्‍यांकडून येत आहे. तसेच टोल फ्री नंबरही बंद आहे, त्यामुळे शेतकर्‍यांना तक्रार करण्यात अडचणी येत आहेत. या सर्व बाबींचा विचार करुन मंडळ घटक धरुन व ऑटोमॅटिक हवामान केंद्राच्या नोंदीनुसार अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण मंडळाला सामुदायिक विमा पंचनामे करण्याचे आदेश राज्याच्या विमा समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव यांना व विमा कंपनी इफ्को- टोकियो यांना देऊन मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त अनुशेषप्रस्थ सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या नांदेड जिल्ह्यातील पोशिंद्याला न्याय द्यावा, अशी मागणीही मराठवाडा शेतकरी प्रतिनिधी प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

या निवेदनाच्या प्रति कृषीमंत्री, कृषी सचिव, कृषी विभाग मंत्रालय मुंबई, कृषी आयुक्त पुणे, महाप्रबंधक इफ्को- टोकियो पीकविमा कंपनी, जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा कृषी अधीक्षक नांदेड, संचालक सांख्यिकी पुणे आयुक्तालय, उपसंचालक सांख्यिकी पुणे आयुक्तालय यांना पाठविल्या आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com