नगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस

नगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस
Saam TV

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी वीज पडली असल्याची माहिती आहे. अकोले तालुक्यात शनिवारी दुपारी पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाले होते.

अकोले, राजूर, मालेगाव, कोहंडी, पिंपरकणे परिसरात पाऊस झाल्याने एकच धावपळ उडाली. भंडारदरा व मुळा पाणलोटात पाऊस सुरू होता. ढगांच्या गर्जना विजेचा कडकडाट पाहायला मिळाला. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. भंडादऱ्याच्या पाणलोटात घाटघर, रतनवाडी येथे धुके दाटले तर मध्येच पाऊस असा धुके पाऊसाचा खेळ सुरू असल्याने पर्यटकांनी मनमुराद आनंद घेतला.

नगर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस
ठरलेलं विमान टाळत, राणेंचा प्रवास दुसऱ्या विमानाने; चिपी विमानतळ उद्घाटनाच मानपमान नाट्य थांबता थांबेना !

आज सकाळपासूनच पाऊसाचे वातावरण होते. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात सोयाबीन काढून ठेवल्यामुळे त्याच्यावर प्लास्टिक कागद टाकून त्याचे संरक्षण करताना दिसले. तर पाऊस आल्याने रस्त्याच्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आसल्याने वाहन चालकांना वाहने चालविण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती.

राजूर ते हिलेदेव रस्त्यावर पाऊस पडल्याने चिखल झाला. त्यामुळे दोन मोटारसायकलच्या अपघातात दोघेजण जखमी झाले. राजूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी तक्रार देऊनही या रस्त्यावर खडी टाकली. मात्र, त्यावर मुरूम टाकणे आवश्यक असताना अधिकारी व ठेकेदार याबाबींकडे दुर्लक्ष्य करीत असल्याने नाराजी व्यक्त करताना माजी सभापती बाळासाहेब देशमुख यांनी केवळ कागदोपत्री घोडे नाचविण्यापेक्षा प्रत्यक्ष काम सुरू होणे आवश्यक आहे. चार दिवसांत काम सुरू न केल्यास खड्ड्यात वृक्षारोपण करून संबंधित खात्याला जाब विचारू.

भंडारदरा, वारुंघुसी, बारी परिसरात जोरदार पाऊस झाला. भंडारदरा जलाशयात पाण्याची आवक वाढल्याने स्पीलमधून पाणी गुळणी फेकत होते. सकाळमध्ये स्पीलवे भिंतीवर पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करून सेल्फी काढतात. पोलिस व जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष असे वृत्त प्रसिद्ध होताच आज शनिवारी सकाळपासून भिंतीवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

Related Stories

No stories found.