मुसळधार पावसाने परभणीतील गणपूर गावाचा मुख्य रस्ता गेला वाहून

जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून होत असलेला ढगफुटी सारखा पाऊस आता कमी होत आहे. पाऊस ओसरू लागल्याने या पावसाने किती हाहाकार माजवला हे चित्र आता हळूहळू समोर येत आहे
मुसळधार पावसाने परभणीतील गणपूर गावाचा मुख्य रस्ता गेला वाहून
मुसळधार पावसाने परभणीतील गणपूर गावाचा मुख्य रस्ता गेला वाहूनराजेश काटकर

परभणी - जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून होत असलेला ढगफुटी सारखा पाऊस आता कमी होत आहे. पाऊस ओसरू लागल्याने या पावसाने किती हाहाकार माजवला हे चित्र आता हळूहळू समोर येत आहे. जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील गणपूर या गावातही पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलाय. जोरदार पावसाने पिकांचे नुकसान तर झालेच आहे, सोबतच गावाला ईतर गावांना जोडणारा प्रमुख रस्ता वाहून गेल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटलाय.

हे देखील पहा -

तीन दिवसांपासून गावातील नागरिकांना कामासाठी बाहेर पडता येईना, जनावरांनाही चरण्यासाठी शेतात नेता येत नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्नही उदभवला आहे. त्यात लाईट नसल्याने गावकऱ्यांच्या संकटात आणखीन वाढ झालीय. सार्वजनिक बांधकाम विभागाने युद्ध स्तरावर हा रस्ता पूर्वपद करावा अशी मागणी गावकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com