नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला गतवैभव मिळवून देणार- हेमंत पाटील

शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविणे, शासनाच्या प्रत्येक योजनांची माहिती त्या- त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचविणे शिवसेनेचे कार्यकर्ते- पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये समन्वय वाढवून शिवसेनेला बळकटी मिळवून द्यावी
खासदार हेमंत पाटील
खासदार हेमंत पाटील

नांदेड : जिल्ह्यात शिवसेनेला जे वैभव होते ते वैभव मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात नांदेड जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असेल असा विश्वास खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केला. कासारखेडा गणातून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सोमवारी (ता. १२) सुरुवात झाली. यावेळी खासदार हेमंत पाटील बोलत होत. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

शिवसेनेची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोचविणे, शासनाच्या प्रत्येक योजनांची माहिती त्या- त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचविणे शिवसेनेचे कार्यकर्ते- पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये समन्वय वाढवून शिवसेनेला बळकटी मिळवून देण्याच्या अनुषंगाने शिवसेनापक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

हेही वाचा -

कासारखेडा गणातून सुरुवात करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळाला असून यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्यासह अनेक जणांची उपस्थिती होती. खासदार हेमंत पाटील म्हणाले की नांदेड जिल्ह्यात शिवसेनेला जे वैभव होते, जी ताकत होती की ताकत आणि ते वैभव पुन्हा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शिवसेनेची गाव तिथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हा संकल्प असून तो पूर्ण केला जाईल. याअनुषंगाने शिवसंपर्क अभियान अधिक गतिमान करण्यात येणार आहे.

नांदेड उत्तर भागात राबविण्यात येत असलेल्या शिवसंपर्क अभियानामध्ये सोमवारी (ताी. १२) दिवशी असंख्य शिवसैनिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी बोलताना आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले की, शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला तो विश्वास सार्थ ठरवत जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन असा विश्वास आमदार बालाजी कल्याणकर यांनी दिला.

येथे क्लिक करा -

तर यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे म्हणाले की, तळागळातील आणि सामान्य नागरिकांच्या पाठीशी सदैव शिवसेना उभी राहिली आहे. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार यांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरुन शिवसेनेने अनेक आंदोलने केली आहेत. कोरोना काळातही शिवसेनेने आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. महाराष्ट्राची वाटचाल शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दमदार सुरु असून आगामी काळातही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या तत्वाने काम करुन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असून खा. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आणि शिवसेनेला भक्कम करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असा संकल्प यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे यांनी व्यक्त केला.

शिवसेना संपर्क अभियानात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका तर आजी- माजी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवून आणत शिवसेनेला शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे ही यावेळी दत्ता पाटील कोकाटे म्हणाले. नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या शिवसंपर्क अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आगामी दहा दिवसाच्या काळात हे अभियान शेवटच्या घटकापर्यंत आणि प्रत्येक गाव वाडी तांडा पर्यंत पोहोचेल असा विश्वासही जिल्हाप्रमुख दत्ता पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी खासदार हेमंत पाटील,आमदार बालाजीराव कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्यासह तालुका प्रमुख जयवंतराव कदम, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष नारायण कदम, माजी सभापती मुंजाजी बाऱ्हाटे, शिवाजी पाटील, माधवराव पाटील, बालाजी पाटील, मारोतराव भंडारकर, मारुती डांगे, माधव कल्याणकर, बंडू पावडे, धनंजय पावडे, महादेव शिंदे, केशव रासे, चंद्रकांत जाधव, पुरभाजी जाधव, राहुल जाधव, शिवाजी जाधव, चांदोबा जाधव, बापूराव जाधव, संभाजीराव जाधव, सुदामराव जाधव, शिवाजीराव जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com