कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात, लोकांनी पळवल्या कोंबड्या...(पहा व्हिडिओ)

सोलापूरमध्ये कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे.
कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात, लोकांनी पळवल्या कोंबड्या...(पहा व्हिडिओ)
कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात, लोकांनी पळवल्या कोंबड्या...(पहा व्हिडिओ)Saam Tv

सोलापूर : सोलापूरमध्ये Solapur कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर स्थानिक नागरिकांची कोंबड्या पळवण्याकरिता मोठ्या प्रमाणात धावपळ उडाली आहे. टेम्पोमधल्या कोंबड्या घेऊन जाण्यासाठी स्थानिकांची झुंबड अपघातास्थळी मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे.

पहा व्हिडिओ-

याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. अपघात झालेल्या टेम्पोमधील सर्व कोंबड्या पळवून नेल्या आहेत. सोलापूर- पुणे महामार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अपघात झाला आहे. पुण्याहून सोलापूर शहराकडे टेम्पो येत होता. सोलापूर शहरानजीक बाळे पुलाजवळ हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी परिसरातील नागरिकांनी कोंबड्या पळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात, लोकांनी पळवल्या कोंबड्या...(पहा व्हिडिओ)
धक्कादायक! माजी सैनिकाने चार मुलांना विष देऊन केली आत्महत्या

सोलापुरात कोंबड्या घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून कोंबड्यांची पळवा- पळवी झाली. रविवारी पहाटेच्या सुमारास सोलापूर- पुणे महामार्गावरील बाळे या ठिकाणी टेम्पोचा अपघात झाला आहे. पुण्यावरुन सोलापूरकडे हा आयशर टेम्पो येत होता. या टेम्पोमधून कोंबड्यांची वाहतूक केली जात होती.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com