खोदकामात गुप्तधन सापडले; हिस्सा न दिल्याने बिंग फुटले

एका जुन्या वाड्यात खोदकाम करताना मजुरांना काहीतरी वस्तू असल्याचे जाणवले. त्यांनी ती वस्तू बाहेर काढली असता एक हंडा निघाला, त्यामध्ये सोने चांदी होते. ही माहिती त्यांनी घरमालकाला दिली. घर मालकाने मजुरांना पैशांचे आमिष दाखवून हंडा ताब्यात घेतला. मात्र मजुरांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याने मुजरांने बिंग फोडले.
खोदकामात गुप्तधन सापडले; हिस्सा न दिल्याने बिंग फुटले
खोदकामात गुप्तधन सापडले; हिस्सा न दिल्याने बिंग फुटलेगोविंद साळुंखे

अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील shreerampur taluka बेलापूर गाव belapur goan मध्ये गुप्तधन Secret money सापडले त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आलंय. एकेकाळी बेलापूर ही जुनी बाजार पेठ होती, त्याकाळी धन Treasure हे सोन्याच्या gold स्वरूपात जमा करून पुरून ठेवले जात असत. गावात असे अनेक जुने वाडे आहेत. अशाच एका जुन्या वाड्यात खोदकाम Excavation work करताना मजुरांना काहीतरी वस्तू असल्याचे जाणवले. त्यांनी ती वस्तू बाहेर काढली असता एक हंडा निघाला, त्यामध्ये सोने चांदी होते. ही माहिती त्यांनी घरमालकाला house owner दिली. घर मालकाने मजुरांना पैशांचे आमिष दाखवून हंडा ताब्यात घेतला. मात्र मजुरांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याने मुजरांने बिंग फोडले. ही माहिती पोलिसांना मिळाल्याने तहसीलदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा सोने - चांदीने भरलेला हंडा ताब्यात घेण्यात आला आहे. Hidden treasure found in Ahmednagar

हे देखील पहा -

बेलापूर गावातील प्रतिष्ठित व्यपारी राजेश हरिप्रसाद खटोड यांच्या घरी खोदकाम सुरू असताना सोने चांदीने भरलेला हंडा तीन मजुरांना सापडला. ही माहिती खटोड यांना कळवल्यानर मजुरांना सात लाख रुपयांचे अमिश दाखवून कोणाला काही सांगू नका असे सांगण्यात आले. घटना होऊन 20 दिवस उलटले तरी मजुरांना सांगितल्याप्रमाणे पैसे मिळाले नाही. ते गुप्त धन आहे. लगेच विकता येत नाही. नंतर पाहू. असे उडवा उडवीची उत्तरे खोदकाम करणाऱ्या तीन मजुरांना दिल जाती होती. अखेर मजुरांनी गावातील जाणकार नागरिकांना घटनेची माहिती दिली. हीच माहिती पोलिसांना कळताच संबधीत घरमालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. घटनेची माहिती जिल्हाभर झाली. आज तहसीलदार आणि पोलीसांनी घटनास्थळी जाऊन सापडलेला हंडा ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात केला आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com