Nagpur News : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात ‘हायअलर्ट’

नागपूर पोलिसांनी शहरात हायअलर्ट जाहीर केला आहे.
Nagpur Police
Nagpur PoliceSaam TV

नागपूर : स्वातंत्र्य दिन (Independence Day) अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी (Police) शहरात हायअलर्ट जाहीर केला आहे. राष्ट्रविरोधी कारवायांच्या शक्यतेमुळे तसेच गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारावर नागपूर पोलिसांनी हा हायअलर्ट जारी केलाय. त्यामुळे रेल्वे स्टेशन, विमानतळ, संघ मुख्यालय, दीक्षाभूमी या ठिकाणी आजपासूनच सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. (Nagpur Police Latest News)

Nagpur Police
Maharashtra Politics : विधानपरिषदेत शिंदे गटाला मोठा धक्का; कामकाज समितीत ठाकरे गटाचा समावेश

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात वाहतूक शाखेतील ३०० पोलीस कर्मचाऱ्यांसह एकूण २२०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. यावेळी सीमेबाहेरून शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त शहरातील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवला आहे. (Nagpur Todays News)

Nagpur Police
Nashik News : सावधान! नाशिकमध्ये १ कोटींचं भेसळयुक्त खाद्यतेल जप्त; एफडीएची मोठी कारवाई

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता बाळगली असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी शस्त्रधारी जवानही तैनात करण्यात आले आहेत. जाहीर केलेला हा ‘हायअलर्ट’ गणेश विसर्जनापर्यंत कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com